
छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण | Shiv Jayanti Speech In Marathi | Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh Marathi | 19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण | Shivaji maharaj bhashan marathi | shivaji maharaj speech in marathi | शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
शिवजयंती २०२४ (भाषण) | Shiv jayanti Speech In Marathi : आजच्या या लेखात आपण शिवजयंती चे शिवाजी महाराज भाषण मराठी व Chhatrapati shivaji maharaj speech in marathi ऑर Shivjayanti Speech In Marathi मिळवणार आहोत. या शिवाजी महाराज मराठी भाषणाला आपण 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या कार्यक्रमात वापरू शकतात. तर चला सुरू करू.
Chhatrapati shivaji maharaj speech in marathi | छत्रपती शिवाजी महाराज भाषण | Chhatrapati shivaji maharaj bhashan marathi | Shivaji maharaj bhashan
प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज योगीराज,
श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..!
या घोषणा ऐकल्या की आजही सगळ्यांची छाती अभिमानाने भरुन येते. असे आपले राजे आजही शेकडो मराठ्यांचा मनावर अधिराज्य करत आहेत. गुलामी मधुन मुक्त होऊन जीवाचा भंडारा करुन रयतेचा स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एकमेव राजा, ज्या काळात देव देखील सुरक्षित नव्हते त्या काळी देवाला देखील संरक्षण देणाऱ्या मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापती राजा म्हणजे मराठ्यांचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज.
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना,
पण ज्यांचे एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात,
त्यांना “छत्रपती” म्हणतात..!
स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते. शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी राजमाता जिजाबाईंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते.
शिवनेरी गडावरी शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी‘ ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोंसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंशाचे होते.
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन इस्लामी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.
छ.शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी (१५५२-१५९७) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना “राजा” ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला.
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित असे घडले होते. बालपणाची सर्व वर्षे ही नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा आणि घोडेस्वारी शिकण्यात गेली. कधीकधी आसपास राहणारी मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळत असत. मावळे हेच शिवरायांचे प्रथम सवंगडी होते.
माता जिजाऊ रामायण, महाभारत तसेच इतर भारतीय महापुरुषांच्या कथा बाल शिवाजींना सांगत असत. त्यातूनच मग पराक्रम आणि प्रजादक्षता असे गुण लहानपणीच शिवाजींच्या अंगी बाणवले गेले. शहाजीराजे सतत मोहिमांवर असत पण वेळ मिळाल्यास ते शिवरायांना वाचन, युद्धकला, घोडेबाजी शिकवत असत. सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.
आदिलशाही, निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्या विरोधात शिवरायांना लढावे लागणार होते. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ म्हणून त्यांनी किल्ले तोरणा अत्यंत लहान वयात जिंकला. त्यांनतर स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने तोंड देण्यात महाराज यशस्वी ठरले.
“अफजलखान वध”, “शायीस्ते खानाची बोटे कापणे”, “अग्राहून सुटका”, “पावनखिंडची लढाई”, “सिंहगडची लढाई” या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. स्वकीय शत्रूना देखील शिवरायांनी चांगलाच धडा शिकवला. याव्यतिरिक्त पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, या बिकट प्रसंगांत संयम आणि धैर्याने केलेला मुकाबला सर्वज्ञात आहे.
शिवरायांना स्वराज्य निर्मिती करता आली ती म्हणजे मावळे आणि योग्य साथीदारांच्या सोबतीने ! प्रत्येक प्रसंगात मावळे जिकीरीने पुढे आले आणि शिवरायांसाठी पर्यायाने स्वराज्यासाठी प्राणाचे मोल चुकवले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर व मुरारबाजी हे शूरवीर तर स्वराज्याच्या स्वप्नासाठी धारातीर्थी पडले.
छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…
आणखी माहिती वाचा :
- Information of Shivaji Maharaj in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती
- Shiv Rajmudra Information in Marathi | शिवराजमुद्रा माहिती मराठी
- Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंती 2025 मराठीत शुभेच्छा
- Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Garjana | छत्रपती शिवाजी महाराज शिवगर्जना
- Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण | Shiv Jayanti Speech In Marathi
- Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
- Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी
- Forts in Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील किल्ले | भाग : 9
- Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
इ. स. ६ जुन १६७४ मध्ये रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. “न भूतो न भविष्यती” असा “जाणता राजा” स्वराज्याला मिळाला. आता संपूर्ण महाराष्ट्रातील रयतेला राजा छत्रपती मिळाला होता. राज्यकारभार व्यवस्थित चालवण्यासाठी शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. स्वतंत्र स्वराज्याचे चलन सुरू केले. आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. शत्रूचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात, न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते.
स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकारण धुरंदर, दूरदृष्टीचे होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. सागरात आरमार जय्यत तयारीत होते. अनेक शूर, लढवय्ये, पराक्रमी वीर स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला. शत्रूचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात, न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते. शेतकऱ्यांची गा-हाणी दूर होत होती.
प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या. स्वराज्याचा विस्तार झाला होता. अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय‘ याचा प्रत्यय आणून दिला होता. त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली. अनेक मोहीमा काढून शिवरायांनी शत्रूला नामोहरम केले. प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे, राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता।
शाहसुनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते॥
अर्थ : प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल. हि महाराजांची राजमुद्रा अनेक कागदपत्रांवर, खलीत्यानवर उमटवण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 14 मे 1640 रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते. संभाजी हे शिवाजींचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होते ज्यांनी 1680 ते 1689 इसवी पर्यंत राज्य केले. संभाजीच्या पत्नीचे नाव येसूबाई होते. त्यांचा मुलगा आणि वारस राजाराम होता. शिवरायांचे समर्थ गुरु रामदास यांचे नाव भारतातील ऋषीमुनी आणि विद्वानांमध्ये प्रसिद्ध आहे.
शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायां नंतरही अनेक राजे उदयास आले. पण सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. याचे कारण आहे त्यांचे स्वराज्य बद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजे होते.
“शत्रूसमोर संकटांना सामोरे जाण्यात शौर्य असण्याची गरज नाही, शौर्य विजयात दडलेले आहे”
शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र झटायचे. शिवाजी महाराज गोरिल्ला युद्ध कलेचे जनक म्हणून देखील ओळखले जातात. ‘ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांच आहे,’ हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वराज्य आणि मराठा सामाज्राचा विस्तार होत असताना, शिवाजी महाराजांनी सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शक्तिशाली आरमार उभारले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते.
स्वराज्याच्या स्थापनेनंतर सीमांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांनी कोकण किनारपट्टीवर मराठा आरमार उभारले. 1658 साली शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना केली होती. त्या काळी मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता. कोकणापासून ते गोव्यापर्यंतच्या समुद्र किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी मराठा आरमार सक्षम होऊ लागले. मराठा साम्राज्याच्या परकीय व्यापाराला पोर्तुगीज, डच, इंग्रजी जहाजांचा अडथळा होत असे. त्यांना कर दिल्याशिवाय कोणत्याही जहाजांना अरबी समुद्रात विहार करता येत नसे. मराठा आरमाराची स्थापना झाल्याने कोकण किनारपट्टीचे पोर्तुगीज, अरबी, डच समुद्री लुटारुंपासून संरक्षण होऊ लागले. मराठा आरमारासाठी सक्षम अशा लढाऊ जहाजांची निर्मिती पेन, कल्याण आणि भिवंडी येथे झाली होती. जहाजांच्या निर्मितीचे काम पोर्तुगीज खलाशी लुई व्हेगास आणि त्याचा मुलगा फेर्ना व्हेगास यांच्या देखरेखीखाली झाले होते. त्यासोबत असंख्य मराठी कामगार जहाजांच्या निर्मितीला हातभार लावत होते. या जहाजांची निर्मिती 1657 ते 1658 दरम्यान झाली होती.
आरमारासोबत समुद्री किल्ल्यांच्या डागडुजी आणि निर्मितीकडेही महाराजांनी लक्ष दिले. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांच्या निर्मितीवरून ते दिसून येते. शिवाजी महाराजांनी या आरमाराची अतिशय शिस्तबद्ध उभारणी केली होती.
अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. तरीही त्याची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अखेर अवघ्या चाळीस वर्षाच्या वयात इ. स. ३ एप्रिल १६८० मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले. परंतु अवघ्या ३४० वर्षानंतर आजही महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात ते जिवंत आहेत.
हिंदुस्थानच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी चरित्र आजही सगळ्यांच्या अंतःकरणात मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान होऊन राहिले आहे. सद्य स्थितीत या महापुरुषाच्या विरगाथेचा आदर्श अखिल हिंदुस्थानासाठी मार्गदर्शक ठरला आहे.
सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे,
काळजात राहती आमुच्या रक्तात वाहती राजे,
तुफान गाजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा,
सन्मान राखतो, जान झोकतो तुफान मातीचा राजा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण | Shiv Jayanti Speech In Marathi | Chhatrapati Shivaji Maharaj Nibandh Marathi | 19 फेब्रुवारी शिवजयंती भाषण | Shivaji maharaj bhashan marathi | shivaji maharaj speech in marathi | शिवाजी महाराज भाषण मराठी लेखन | chhatrapati shivaji maharaj speech in marathi | छत्रपती शिवाजी महाराज भाषण | chhatrapati shivaji maharaj bhashan marathi | shivaji maharaj bhashan
आणखी माहिती वाचा :
- Information of Shivaji Maharaj in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती
- Shiv Rajmudra Information in Marathi | शिवराजमुद्रा माहिती मराठी
- Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज निबंध
- छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण | Shiv Jayanti Speech In Marathi
- Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
- Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी
- Forts in Maharashtra in Marathi | महाराष्ट्र राज्यातील किल्ले | भाग : 9
Leave a Reply