Three and half Shakti Peeth in Marathi | महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तीपीठ

Three and half Shakti Peeth Information in Marathi

Table of Contents

महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तीपीठ आणि त्यांची माहिती  | Three and half Shakti Peeth in Maharashtra Information in Marathi

Three and half Shakti Peeth Information in Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Three and half Shakti Peeth in Marathi : देवीच्या निरनिराळ्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे दर्शन घडते. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. ‘अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. आदिशक्तीचे स्वरूप अत्यंत विराट, विश्वाकार आहे.

आदिशक्ती नाना प्रकारच्या प्रतिकांतून प्रकट होते. आदिशक्तीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन पीठे आहेत. यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंद्रे मानली जातात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंद्रांचा ज्यात समावेश केला जातो, अशी एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत.

कोल्हापूरची महालक्ष्मी बद्दल संपुर्ण माहिती | Mahalakshmi – Kolhapur

साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले पूर्ण पीठ म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची ओळख आहे. करविरनिवासिनी महालक्ष्मी (अंबाबाईचे) हे निवासस्थान. पुराणात उल्लेख करण्यात आलेल्या  108 शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रातील या शक्तिपीठांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अनेक पुराण आणि जैन ग्रंथांमध्ये याचा समावेश आहे. त्यामुळेच अंबाबाईंचे हे मंदिर पुरातन असल्याचे म्हटले जाते.

मंदिराचा इतिहास (History) :

महालक्ष्मी देवीचे हे मंदिर कोणी बांधले याबद्दलची माहिती निश्चित झालेली नाही. पण देवस्थान समितीच्या माहितीनुसार हे मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले आहेत. या शिवाय ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे माहात्म्य प्रस्थापित झाले होते. हे सांगण्याचे कारण असे की, देवीच्या डाव्या हातातील अंगठी केली महालक्ष्मीला राष्ट्रकुट राजा प्रथम अमोघवर्ष यांने अर्पण केली आहे. याचा उल्लेख संजान या ताम्रपटात करण्यात आला आहे.

हे मंदिर कऱ्हाड येथील सिंदवंशी राजाने बांधले असे देखील म्हटले जाते. पण त्याने हे बांधण्यापूर्वीच हे देवस्थान शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे या मंदिराबाबत इतिहासात अनेक गोष्टी आहेत. देवळाच्या निरनिराळ्या भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. या मंदिरापाठी असलेल्या दत्त मंदिराच्या पाठीमागे  शके 1940 चा एक शिलालेख कोरलेला आहे. दुसरा शिलालेख हा पटांगणातील खांबावर, तिसरा.मुख्य देवळाच्या नवग्रहाच्या छोट्या देवळातील खांबावर आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या भिंतीवर आहे.

मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. गरूड मंडप, सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

कोल्हापूरकरांच्या  मनात महालक्ष्मीबद्दल अफाट श्रद्धा आहे.या देवीची कथा अशी सांगितली जाते की इंद्र आणि महिषासूर यांच्यात युद्ध सुरु झाले. ते जवळजवळ शंभर वर्ष सुरु होते. यामघ्ये शेवटी इंद्राचा या युद्धात पराभव झाला. महिषासूर स्वर्गाचा राजा झाला. ज्यावेळी ही गोष्ट साक्षात शंकर यांना कळली. त्यावेळी त्यांचा राग अनावर झाला. त्यांच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडू लागला.या अग्नीतूनच देवी प्रकट झाली. सर्व देवांनी तिची प्रार्थना केली. तिला देवांनी शस्त्रे दिली.

देवीचे आणि महिषासुराचे युद्ध झाले. देवीने महिषासुराला आणि इतर राक्षसांना मारले. तीच ती महालक्ष्मी. शिवाय ब्रम्हदेवाचा मानस पुत्र कोल्हापूर त्याच्या मुलाचे नाव करवीर..करवीरने लोकांचा छळ केल्यानंतर शंकराने महालक्ष्मीमुळे त्याला ठार मारले. म्हणून या परीसराला ‘करवीर’ नावाने ओळखतात.

दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात आणि नोव्हेंबरमध्ये भाविकांची फार गर्दी असते. या दरम्यान मंदिरात चमत्कार घडतो असे सांगितले जाते. कारण या कालावधी दरम्यान येणारी सूर्याची किरणे थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात. त्यानंतर ती फेब्रुवारी आणि नोव्हेंबर दरम्यान किरणे छातीपर्यंत पोहचतात.मावळतीला ही सूर्यकिरणे संपूर्ण देवीच्या मुर्तीवर पडतो. त्यावेळी देवीचे हे स्वरुप विलोभनीय वाटते. या महोत्सवाला ‘किरणोत्सव’ असे म्हणतात. यावेळी भाविकांची खूपच गर्दी असते.


आणखी माहिती वाचा : Almond Oil Benefits in Marathi | बदाम तेलाचे फायदे, उपयोग आणि दुष्परिणाम


तुळजापुरची तुळजाभवानी बद्दल संपुर्ण माहिती | Tuljabhavani – Tuljapur

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या शहरामध्ये हे मंदिर वसलेले आहे. सोलापूर शहरापासून फक्त 45  किलोमीटर अंतरावर हे मंदिर असून तुळजापूर मंदिरात कानडी भाविक मोठ्याप्रमाणात येतात. महाराष्ट्रातील हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो.

मंदिराचा इतिहास (History) :

तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर हे बालाघाट डोंगराच्या पठारावर वसलेले आहे. पुराणात या डोंगराचा उल्लेख यमुनागिरी असा केलेला आहे. कालांतराने या ठिकाणी चिंचेची झाले असल्यामुळे याचे नामकरण चिंचपूर असे करण्यात आले. त्यानंतर या परीसराची ओळख तुळजापूर अशी झाली ती आदिमाया तुळजाभवानी मुळे. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला फार मान आहे.

पुराणातील दाखल्यानुसार कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात धर्मराजासाठी आणि कलियुगात श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तुळजाभवानी आशीर्वादरुप ठरली आहे.  तुळजाभवानी मंदिरातील काही शिल्प हे हेमाडपंथी आहेत. या मंदिरात काळभैरव, आदिमाया व आदिशक्ती, घाटशीळ, पापनाश तीर्थ, रामवरदायिनी, भारतीबुवाचा मठ, गरीबनाथाचा मठ, नारायणगिरीचा मठ, धाकटे तुळजापूर, मंकावर्ती कुंड या मंदिर परीसरात आणि मंदिरात आहेत.

इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात. नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र, हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासंदर्भात एक आख्यायिका फारच प्रसिद्ध आहे. असे म्हणतात कृतयुगात ‘कर्दभ’ नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी ही फार सुंदर आणि पतीव्रता होती. तिला पुत्ररत्न झाले. पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्दभ ऋषींचे लवकर निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला. पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून पतिसोबत जाऊ नये असे ऋषींनी तिला शास्त्राचा आधार घेऊन सांगितले.

त्यामुळेच ती पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरु  पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परीसरात गेली. त्याठिकाणी आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरु केली. तपश्चर्या सुरु असताना तेथे कुकर नावाचा एक दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर खुश झाला. त्याच्या मनात वाईट वासना येऊ लागली. त्याने तिला वासनेपोटी स्पर्श केला आणि तिची तपश्चर्या भंग झाली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिमायेचा धावा केला. त्वावेळी देवी त्या ठिकाणी धावून आली. तिने दैत्याशी युद्ध केले. त्रिशुळाने दैत्याचे शीर वेगळे केले. देवी त्वरीत धावून आल्यामुळे तिला ‘त्वरीता’ असे नाव पडले. पुढे त्वरीताचे तुळजापूर झाले आणि देवीचे नाव तुळजाभवानी

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सणोत्सव: तुळजाभवानी देवीच्या उपासनेत शारदीय नवरात्राला महत्व आहे.याकाळात येथे मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. अत्यंत पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार महिषासुर दैत्यासूरासोबत 9  दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर देवी निद्रा घेण्यासाठी मंचकी जाते. | Three and half Shakti Peeth in Marathi

म्हणूनच नवरात्र संपताच या ठिकाणी विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. तसेच प्रत्येक पौष महिन्यात शांकभरी देवीचा उत्सव देखील याठिकाणी साजरा केला जातो. शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच हा उत्सव साजरा केला जातो. ज्यांना नवरात्रीत येणे शक्य होत नाही ते भाविक शांकभरी नवरात्राच्या सोहळ्याला सहभागी होतात.

माहूरची रेणूका बद्दल संपुर्ण माहिती | Renuka – Mahur

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक जागृत पीठ म्हणून माहूरची रेणुकादेवी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र माहूरचे देवस्थान आहे. माहूर गडावर रेणुकादेवी सोबत दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील मंदिरे आहे. साडेतीन शक्तिपीठांमध्ये रेणुका देवीचे मंदिर हे दुसरे शक्तिपीठ आहे. या देवीला तांबुलाचा प्रसाद दिला जातो. खायची पान घेऊन त्यात कात, चुना, सुपारी असे यामध्ये टाकले जाते. पान कुटून हा प्रसाद देवीच्या मुखात ठेवला जातो.

मंदिराचा इतिहास (History) :

श्री परशुरामाची माता म्हणून रेणुका मातेला ओळखले जाते. रेणुका मातेचे मंदिर हे 13 व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असे सांगितले जाते. याच माहूरगडावर श्री दत्तात्रयाचा जन्म झाला.अशी भाविकांची श्रद्धा आहे. रेणुकामातेचे हे मंदिर कमलमुखी असून  आनादी काळापासून असल्याचे ते सांगितले जाते. साधारण 800 ते 900 वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना करण्यात आली.

मंदिराच्या मुख्य दरवाज्याची पुर्नबांधणी इ. स. 1546 मध्ये करण्यात आली. या संदर्भातील एक शिलालेख देखील या ठिकाणी आहे. हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बांधण्यात आले आहे. माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. हे स्थान नांदेड जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. | Three and half Shakti Peeth in Marathi

माहूरच्या रेणुका देवी संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यापैकी एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणु असे ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमद्ग्नी ऋषींसोबत तिचा विवाह झाला. जमद्गनी ऋषींच्याय आश्रमात सगळ्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय होती. राजा सहस्त्रार्जुनाला कामधेनुचा मोह झाला.राजाने कामधेनुची मागणी केली. पण जमद्गनी ऋषींनी ती दिली नाही.

त्यामुळेच त्यांनी आश्रमावर धावा बोलला आणि जमद्गनी ऋषींना ठार मारले. कामधेनू हिरावून नेली. हा प्रकार पाहून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिक्षा केली. जमदग्नी म्हणजेच वडिलांवर अत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भूमी दत्तात्रयाने द्यांना दाखवली. तो आई आणि जमद्गनी ऋषींचे पार्थिव घेऊन माहूरगडावर पोहोचला. तेथे त्याने मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. जमद्ननी ऋषींवर सगळे संस्कार केले. यावेळी रेणुका माता सती गेली. | Three and half Shakti Peeth in Marathi

आपल्या आईचा दुरावा परशुरामाला सहन झाला नाही. तो दु:खी झाला. त्याची ती अवस्था पाहून एक आकाशवाणी झाली. तुझी आई जमिनीवरुन वर येऊन तुला दर्शन देईल असे सांगितले. फक्त तू मागे पाहू नकोस असे सांगितले. पण परशुरामाला आईला भेटण्याची इच्छा इतकी होती की, त्याने मागे वळून पाहिले त्यामुळे रेणुकामातेचे केवळ मुखच  जमिनीतून वर आले.

परशुरामाला रेणुका मातेचे दर्शन याच डोंगरावर झाले म्हणून याला मातापूर असे म्हणतात. आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव. आईचे गाव म्हणून माऊर आणि पुढे त्याचा अपभ्रंश करत माहूर असे नाव पडले. अशी ही रेणुकामातेची कथा आणि गडाचे महत्व सांगितले जाते.

शारदीय नवरात्रौत्सव या ठिकाणी फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. नवरात्रीच्या काळात देवीचे मंदिर सुंदर सजवण्यात येते. नऊ दिवस येथे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या शिवाय शाकंभरी नवरात्र देखील साजरी केली जाते. अश्विन शुक्लपक्ष म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा या गडावर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी देवीची संपूर्ण पूजा केली जाते. रात्री भजन, किर्तन आयोजित केले जाते. पंचखाद्य टाकून दुध घोटलेला प्रसाद पूर्ण चंद्र पाहून हा नैवद्य देवीस दाखविला जातो. श्रावण शुद्ध त्रयोदशीला रेणुकेची पंचामृताने स्नान घालून विधीवत संपूर्ण पूजा केली जाते.


आणखी माहिती वाचा : रोज पाणी पिण्याचे फायदे  | Benefits of Drinking Water in Marathi


वणीची सप्तशृंगी बद्दल संपुर्ण माहिती | Saptashrungi – Vani

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ म्हणजे नाशिकच्या वणी येथील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते.  पुराणात उल्लेख केलेल्या 108 शक्तीपिठांमध्ये याचा उल्लेख आहे.नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ सप्तश्रृंगी किल्ला असून ती येथील कुटुंबियांची कुलदैवत आहे. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले.

सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगावात उत्तम खवा मिळतो. त्याचा आस्वाद घेण्यासाठीही येथे गर्दी असते.पहाटे 5 वाजता हे मंदिर उघडते. येथे काकड आरतीने देवीच्या महापूजेला सुरुवात होते. सप्तश्रृंगी मंदिरासोबतच या ठिकाणी कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शितकजा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम ही ठिकाणे या गडावर आहेत.

मंदिराचा इतिहास (History) :

सप्तश्रृंगी गडावर देवीचे मंदिर असून  साधारण पाच- सात किलोमीटरच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा ओलांडून सप्तश्रृंगी गड दिसू लागते. नाशिकचे कोन्हेरे, रुद्राजी आणि कृष्णाजी यांना साधारण 1768-99;मध्ये त्यांनी या गडाच्या पायऱ्या बांधल्या. खंडेराव दाभाड्यांची पत्नी उमाबाई दाभाडे यांनी 1710 साली वरील पायऱ्या बांधल्या.  याचा उल्लेख संस्कृत आणि शिलालेखातून आलेला आहे. असे म्हणतात पूर्वी गडावर 108 कुंड असल्याचा उल्लेख आहेत त्यातील केवळ 10 ते 15 कुंड सध्या अस्तित्वात आहेत. देवीच्या मागील बाजूस उत्तरेकडे तांबूलतीर्थ आहे. या कुंडातील पाण्याचा रंग तांबडा आहे. असं म्हणतात देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला म्हणून येथील पाणी लालसर झाले. या मंदिराला प्राचीन संदर्भ आहेत.

सप्तश्रृंग येथे वास्तव्य करणारी सप्तश्रृंगी देवीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. दंडकारण्यात राम- सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनासाठी आल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. शिवाय महानुभावी लीळाचरित्रास असा उल्लेख केलेला आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मुर्चीत येऊन पडला तोच हा सप्तश्रृंग गड  होय.

आणखी एक गोष्ट सांगायची तर कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून महिषासुराला मिळाला होता. म्हणूनच तो माजला होता. त्याने स्वर्गावर आक्रमण करत देव इंद्राला हाकलून दिले. त्यामुळे त्याने त्रिदेवांकडे मदत मागितली. त्या तिघांनी त्यांची शक्ती एकवटून एका तेजाची निर्मिती केली अंबेच्या रुपाने ते तेज पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासुर सप्तश्रृंगी जवळ होता. देवीने त्याचा तेथे वध केला आणि त्याच्या जाचातून लोकांना मुक्त केले. म्हणूनच या डोंगरावर तिचे स्थान आहे.

सप्तश्रृंगी देवीचा चैत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव साधारण दहा ते बारा दिवस सुरु असतो.  गडावर चैत्रोत्सव सुरु झाला की, या ठिकाणी भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी होते. अश्विन शुद्ध म्हणजेच नवरात्र येथे साजरी केली. नवरात्रीतल्या सप्तमीला देवी या गडावर वास करते असे म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी गर्दी अधिक असते. नवरात्रीनंतर येणारी कोजागिरी पौर्णिमादेखील या ठिकाणी साजरी केली जाते. तसेच धनुर्मासात सूर्यनारायण दक्षिणायन करतात. धनुर्मास उत्सवदेखील या ठिकाणी साजरा केला जातो.

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*